मनसेच्या वर्धापनदिनाचा मेळावा यंदा पहिल्यांदाच पुण्यात
मनसेच्या वर्धापनदिनाचा मेळावा यंदा पहिल्यांदाच पुण्यात

MNS Anniversary : आज मनसेचा वर्धापन दिन; राज ठाकरेंच्या सभेकडं सर्वांचं लक्ष

आज मनसेचा वर्धापन दिन आहे. राज ठाकरेंच्या सभेकडं सर्वांचं लक्ष लागले आहे.

आज मनसेचा वर्धापन दिन आहे. राज ठाकरेंच्या सभेकडं सर्वांचं लक्ष लागले आहे. दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात पहिल्यांदाच साजरा केला जाणार आहे.मनसेला आज 17 वर्ष पूर्ण होत आहेत. 9 मार्च 2006 साली मनसेची स्थापना झाली.

मनसेच्या वर्धापनदिनाचा टीझर देखील रिलीज झाला आहे. मनसेच्या ट्विटर अकाउंटवरून हा टीझर शेअर करण्यात आला आहे. 'नव्या दमाने, नव्या आयुधांसह... नवनिर्माणास सज्ज'असे ब्रीदवाक्य या टीझरमध्ये आहे.

वर्धापनदिनाच्या निमित्ताने आज गडकरी रंगायथन येथे सायंकाळी सहा वाजता ठाकरेंची सभा होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com