Rohit Pawar : पक्षाचं नाव आणि चिन्ह बळकावलं तरी #original पक्ष कोणता आहे हे कालच्या निवडणुकीत सिद्ध झालं

Rohit Pawar : पक्षाचं नाव आणि चिन्ह बळकावलं तरी #original पक्ष कोणता आहे हे कालच्या निवडणुकीत सिद्ध झालं

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) माटुंगा इथल्या षण्मुखानंद हॉल या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करणार आहेत तर 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष अहमदनगरच्या न्यू आर्टस कॉलेजच्या मैदानावर वर्धापन दिन साजरा करणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता ट्विट करत रोहित पवार म्हणाले की, आज 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षा'चा #रौप्यमहोत्सवी_वर्धापन दिन! पक्षाचं नाव आणि चिन्ह बळकावलं तरी #original पक्ष कोणता आहे हे कालच्या निवडणुकीत सिद्ध झालं.

त्यामुळं #शिव_शाहू_फुले_आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर वाटचाल करणाऱ्या आपल्या original पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षावर प्रेम आणि निष्ठा असलेले सामान्य नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते या सर्वांना मनापासून शुभेच्छा. असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com