ताज्या बातम्या
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस; तब्येत खालावली, उपचार घेण्यास नकार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा उपोषण सुरु करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा उपोषण सुरु करण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत असून जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा हा आठवा टप्पा असून त्यांनी याआधी सात टप्प्यात उपोषण केल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.
याच पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असून रात्री उशिरा आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानी मनोज जरांगे पाटील यांना उपचार घेण्याची विनंती केली मात्र जरांगेनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. जरांगेसह अनेक उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे.