ताज्या बातम्या
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस; अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार
आज विरोधक विधिमंडळ परिसराबाहेर विविध प्रश्नांवरुन आंदोलन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरु असून महायुती सरकारचे हे पहिले हिवाळी अधिवेशन होते. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे.
आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार असून अधिवेशनानंतर विरोधी पक्षांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे. तसंच आजदेखील विरोधक विधिमंडळ परिसराबाहेर विविध प्रश्नांवरुन आंदोलन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
16 तारखेपासून हे अधिवेशन सुरु झाले आहे. आज शेवटचा दिवस असून 5 दिवस हे अधिवेशन चालले. आजही विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता आहे. आज सभागृहाची विशेष बैठक अध्यक्षांनी बोलवली असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर 11 वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.