Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केलं आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, आंदोलन काळातील आंदोलकावरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला प्रतिउत्तर म्हणून मंगेश ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उपोषण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. जालन्यात ओबीसी - मराठा संघर्षाची शक्यता आहे.
यासोबतच आता मनोज जरांगे पाटील यांच्यापाठोपाठ लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषण करतात का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
वडीगोद्रीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.