ताज्या बातम्या
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस; पत्रकार परिषदेतून काय बोलणार?
मनोज जरांगे पाटील यांची आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार
थोडक्यात
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा एकदा उपोषण
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस
मनोज जरांगे पाटील यांची आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा उपोषण सुरु करण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत असून जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा हा आठवा टप्पा असून त्यांनी याआधी सात टप्प्यात उपोषण केल्याचे पाहायला मिळाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार असून या पत्रकार परिषदेतून जरांगे काय बोलणार? याकडे लक्ष लागलं आहे.