रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस
संदीप शुक्ला, बुलढाणा
रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
कापूस आणि सोयाबीनसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्याच्या सिंदखेडराजा येथून जिजाऊ जन्म स्थान राजवाडासमोर बसून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहेत. सरकारकडून तुपकर यांचे आंदोलनाची दखल घेतली गेली नाही आहे.
सोयाबीन कापूस दरवाढ, शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा, घरकुलाचे हप्ते वेळेवर मिळावेत अतिवृष्टी व ढगफुटी मुळे झालेले शेतकऱ्याचे नुकसान याची तात्काळ भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्याच्या सिंदखेड राजा येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळताना दिसत आहे.
सोयाबीन, कपाशीच्या दरासाठी रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झालेलं पाहायला मिळत असून राज्यात रविवारपासून चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.