सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आजचा तिसरा दिवस

सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आजचा तिसरा दिवस

दोन दिवसांपासून सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे.

दोन दिवसांपासून सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. आज या सुनावणीचा तिसरा दिवस आहे. काल झालेल्या दुसऱ्या दिवशीदेखील ठाकरे गटांकडून अॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. सिब्बल यांनी राजकीय पक्ष-विधीमंडळ पक्ष, मुख्य प्रतोद, पक्षातील बंडखोरी, तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर युक्तिवाद केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. तर, दुसरीकडे याचिकेवर वेगळ्या बेंचपुढे सुनावणी घेण्याची ठाकरे गटाची मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे. ठाकरे गटाला हा काहीसा दिलासा असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान कालची सुनावणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण झाला. आज शिंदे गटाकडून युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. आज या प्रकरणावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com