Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर टोलवाढ; 1 एप्रिलपासून होणार अंमलबजावणी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर टोलवाढ; 1 एप्रिलपासून होणार अंमलबजावणी

समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. समृद्धी महामार्गावर टोलवाढ करण्यात येणार असल्याची माहिती मिळत असून 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

डिसेंबर 2022 मध्ये टोल दर जाहीर करण्यात आले होते. इगतपुरी ते आमने हा उर्वरित 76 किमीचा मार्ग आता सेवेत दाखल होणार आहे. याच्याआधी हा टोल दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

संपूर्ण मार्ग सुरू झाल्यावर मुंबई ते नागपूर प्रवासासाठी कार चालकांना 1445 रुपये, तर नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी 1290 रुपये टोल लागणार आहे. समृद्धी महामार्गावरील पथकरात 19 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

नागपूर - इगतपुरी प्रवासासाठी किती टोल ?

वाहनांचे प्रकार नवे दर

कार, हलकी मोटार 1290

हलकी, व्यावसायिक, मिनी बस 2075

बस अथवा दोन आसांचा ट्रक 4355

तीन आसांची व्यावसायिक 4750

अवजड बांधकाम यंत्रसामुग्री 6830

अति अवजड वाहने 8315

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com