उन्हाळ्यात 'या' फळांचा रस प्याल, तर मिळतील आश्चर्यकारक परिणाम
उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी अनेकदा थंडगार फळांचा रस प्यायला जातो. त्यातही शहरांपासून गावांपर्यंत उसाचा रस हे अगदी लोकप्रिय पेय आहे. त्याशिवाय संत्र, मोसंबी, लिंबू या फळांचे रस अधिक प्रमाणात सेवन केले जातात. मात्र उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा याकरता टोमॅटो, टरबूज, संत्री, काकडी यांचा रस अधिक लाभदायी ठरतो.
टोमॅटो, कलिंगड, काकडी इत्यादी फळे आणि भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यात खनिजे असून आपले शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे उन्हाळ्यात खूप फायदेशीर ठरतात. या पदार्थांमध्ये थोडेसे लिंबू आणि पुदिना टाकल्यास तुमचे रस आणखी ताजेतवाने करण्याकरता उपयुक्त ठरते.
या वेळी घ्या फळांचा रस
जेवणांमध्ये कमीत कमी दोन तास आणि जेवणानंतर २० मिनिटे थांबणे हा एक चांगला नियम आहे. सकाळी नाश्त्यापूर्वी ज्यूस पिण्याची सर्वोत्तम वेळ आहे, परंतु जर तुमची उर्जा पातळी कमी असेल तर तुम्ही जेवणांच्या दरम्यान ते पिऊ शकता.