ताज्या बातम्या
Railway Megablock : मध्य व हार्बर मार्गावर उद्या; तर पश्चिम रेल्वे मार्गावर आज मध्यरात्री मेगाब्लॉक
मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेतील दोन मार्गांवर उद्या, रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असून त्याचे वेळापत्रक जारी झाले आहे.
मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेतील दोन मार्गांवर उद्या, रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असून त्याचे वेळापत्रक जारी झाले आहे. मध्य रेल्वेवर दुपारी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असून हार्बर मार्गावरही याच वेळात म्हणजे दुपारी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असते. दरम्यान, वाशी ते ठाणे दरम्यान यावेळेत रेल्वेसेवा बंद राहणार असल्याचेही सांगितले जात आहे. तर पश्चिम रेल्वेवर आज, शनिवारी मध्यरात्री ब्लॉक असून उद्या, रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावरील सेवा सुरळीत राहणार आहे.