ताज्या बातम्या
Toor Dal Rates : तूर डाळ एवढ्या रुपयांनी महागली
खाद्यतेलाचे किमतीने सामान्यांना काहीसा दिलासा दिला आहे
खाद्यतेलाचे किमतीने सामान्यांना काहीसा दिलासा दिला आहे मात्र डाळींच्या किमतीत वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्यांचे खिशाला कात्री बसत आहे.
तूर डाळ १५ रुपयांनी महागली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात तर १६० रुपये किलोवर पोहोचला आहे.सणासुदीच्या काळात डाळींच्या किमती वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमध्ये ठेवलेली डाळ खुल्या बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तूर डाळीच्या साठ्यावर लक्ष ठेवण्यास तसेच त्याची सर्व माहिती सरकारला देण्याचे आदेश दिले आहे. तूरडाळीच्या वाढत्या भावामुळे मात्र सामान्यांचे बजेड कोलमडले आहे.