Cough Syrup : कोल्ड्रिफपाठोपाठ आता 'या' दोन औषधांत विषारी घटक आढळले
थोडक्यात
तामिळनाडूतील एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधाच्या नमुन्यांत भेसळ
कोल्ड्रिफपाठोपाठ आणखी दोन औषधांत विषारी घटक आढळले
रेस्पिफ्रेश टीआर आणि रिलाइफ या दोन औषधांचा यामध्ये समावेश
(Cough Syrup) मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बालकांचा मृत्यू तामिळनाडूत उत्पादन होणाऱ्या एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधामुळे झाला. तामिळनाडूतील एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधाच्या नमुन्यांत भेसळ आढळून आली असून या औषधावर बंदी घालण्यात आली.
औषधामध्ये असलेल्या डायथिलीन ग्लायकोल या विषारी घटकामुळे या बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनसुद्धा सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता नवीन एक माहिती समोर आली आहे ती म्हणजे कोल्ड्रिफपाठोपाठ आता आणखी दोन औषधांमध्ये विषारी घटक आढळून आल्याची माहिती मिळत आहे.
रेस्पिफ्रेश टीआर आणि रिलाइफ या दोन औषधांचा यामध्ये समावेश आहे. मध्य प्रदेशने आणखी दोन खोकल्यांच्या औषधांमध्ये विषारी घटक सापडला असल्याचे जाहीर केले असून अन्न व औषध प्रशासनाकडून औषध विक्रेत्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.