Toyota Mini Fortuner : सर्वसामान्यांचे स्वप्न सत्यात उतरले; परवडणाऱ्या दरात मिनी फॉर्च्यूनर कार उपलब्ध
आपल्याकडे चारचाकी गाडी असावी आणि त्यातही फॉर्च्यूनरसारखी गाडी असावी असे कोणाचे स्वप्न नसते. मात्र सर्वसामान्य लोकांसाठी हे स्वप्न फक्त स्वप्नच राहते, कारण या फॉर्च्यूनर गाडीची किंमत सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारी अशी असते. मात्र याच सर्वसामान्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी टोयोटा कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. टोयोटा कंपनीने मध्यमवर्गीयांसाठी मिनी फॉर्च्यूनर कार लॉन्च केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे स्वप्न सत्यात उतरण्याची वेळ आली आहे.
टोयोटा ही एक जपानची कंपनी असून जगातील सर्वात मोठ्या वाहन उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी विविध प्रकारच्या गाड्यांची निर्मिती करते. याच कंपनीने सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन मध्यमवर्गीयांना परवडेल, अशी SUV Hyryder ची नवीन 2025 ची आवृत्ती म्हणजेच मिनी फॉर्च्यूनर कार बाजारात आणली आहे. 27 किमी मायलेज देणारी ही मिनी फॉर्च्यूनर आणि लक्झरी फीचर्सने लोडेड आहे. सध्या या कारची सोशल मीडियावरही मोठी चर्चा आहे. ही कार फॉर्च्यूनरसारखी दिसत असल्यामुळे या कारला मिनी फॉर्च्यूनर म्हणून नाव दिल आहे. टोयोटा कंपनीने या कारच्या फीचर्समध्ये बदल केला असून ही कार आता हायब्रीड, पेट्रोल आणि सीएनजी या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड स्वयंचलित गिअरबॉक्स असे विविध ऑपशन्स देण्यात आले आहेत. Fortuner
सीएनजीमध्ये ही कार 27 किमी मायलेज तर हायब्रीडमध्ये ही कार 20 ते 22 किमी मायलेज देते. या कारला एक स्पोर्ट कारसारखा लुक देण्यात आला आहे. या कारमध्ये हवेशीर फ्रंट सीट, मोठी टचस्क्रीन, 6 एअरबॅग, ईबीडी आणि 360 डिग्री कॅमेरासह अनेक युनिक फिचर्स देण्यात आले आहेत. ज्या योगे लोकांना अनेक अॅडव्हान्स फीचर्स या मिनी फॉर्च्यूनरमध्ये मिळणार आहे. ही कार नागरिकांना 11.34 लाख रुपयांमध्ये मिळणार असून यामध्ये व्हेरिएंट आणि इंधन प्रकारानुसार या कारची किंमत 19 लाखांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या घरासमोर ही आता फॉर्च्यूनरसारखी गाडी पाहायला मिळणार आहे.