डीजे मार्टिन गॅरिक्सच्या कार्यक्रमासाठी ठाणे, नवी मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल

डीजे मार्टिन गॅरिक्सच्या कार्यक्रमासाठी ठाणे, नवी मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल

नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये संगीतकार डीजे मार्टिन गॅरिक्स याच्या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये संगीतकार डीजे मार्टिन गॅरिक्स याच्या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे, नवी मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून नागरिक नवी मुंबईत येण्याची शक्यता असल्याने या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाण्यातून नवी मुंबईत वाहतूक करणारी अवजड वाहने ठाण्याच्या वेशीवर रोखली जाणार असून शुक्रवारी दुपारी 2 ते रात्री 12पर्यंत हे वाहतूक बदल कायम असणार आहेत. मुंबई, वसई, विरार येथून घोडबंदरमार्गे ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना फाऊंटन हॉटेलजवळ आणि घोडबंदर येथून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना गायमुख येथे प्रवेशबंदी असेल.

गॅमन जंक्शन, पारसिक चौक, खारीगाव टोलनाका, मुंब्रा बाह्यवळण मार्गे नवी मुंबई वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना पारसिक चौक येथे प्रवेशबंदी असेल. तर विटावा, बाळकूम, साकेत, कळवा मार्गे नवी मुंबई जाणाऱ्या जड अवजड वाहनांना कळवा नाका येथे प्रवेशबंदी असणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com