Admin
बातम्या
कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास बंद
कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास बंद
कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास बंद राहणार आहे. VMS, VSD सिस्टीम बसविण्यासाठी निर्णय घेण्यात आल्यामुळे ही वाहतूक बंद राहणार आहे. व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन कात्रज बोगद्याची साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.
त्यामुळे यावेळेत रस्त्यावरील वाहतूक जुना कात्रज बोगदा मार्ग कात्रज चौक, नवले पुल, विश्वास हॉटेलपासून सेवा रस्त्यावरुन मुंबईकडे वळविण्यात येणार आहे.
१८ मार्च रोजी रात्री ११ ते १९ मार्च रोजी पहाटे २ वाजेपर्यंत तसेच, २३ मार्च रोजी रात्री ११ वाजल्यापासून २४ मार्च रोजी पहाटे २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.