ख्रिसमसची सुट्टी आणि विकेंडला फिरायला जात असाल तर वेळेचं नियोजन कराच; एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

ख्रिसमसची सुट्टी आणि विकेंडला फिरायला जात असाल तर वेळेचं नियोजन कराच; एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

ख्रिसमसची सुट्टी आणि विकेंडला फिरायला जात असाल तर वेळेचं नियोजन करा.

ख्रिसमसची सुट्टी आणि विकेंडला फिरायला जात असाल तर वेळेचं नियोजन करा. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर खालापूर टोलजवळ वाहनांच्या रांगा दिसून येत आहेत. ख्रिसमसची सुट्टी तसंच विकेंडच्या सुट्टीमुळे पुण्याकडे जाण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे.

खालापूर टोलनाक्याजवळ आणि बोरघाट येथील अमरिकांजन पुलाजवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आज वीकेंड असल्याने एक्स्प्रेस वेवर वाहनांची संख्या अधिक आहे. अपक्षेपेक्षा जास्त वाहनांची संख्या दिसून येत आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्यांचे वाहतूक कोंडीमुळे मोठे हाल होत आहेत.

पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर खालापूर टोलजवळ वाहनांच्या रांगा दिसून येत आहे. त्यामुळे पुण्याला जात असाल किंवा मुंबईला येत असाल तर वेळेचं नियोजन करुनच बाहेर पडा. कारण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिकचा सामना करावा लागू शकतो. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सकाळपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आता तर रविवारी ख्रिसमस सुट्टी असल्याने अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com