Railway Ticket Rate : आजपासून ट्रेन प्रवास महागला; तिकीटात किती वाढ झाली?

Railway Ticket Rate : आजपासून ट्रेन प्रवास महागला; तिकीटात किती वाढ झाली?

रेल्वे प्रवाशांसाठी आजपासून महत्त्वाचा दिवस ठरला आहे, कारण आजपासूनच ट्रेन प्रवास महागला आहे. रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, तिकीटाच्या किमतीत वाढ लागू होणार आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

रेल्वे प्रवाशांसाठी आजपासून महत्त्वाचा दिवस ठरला आहे, कारण आजपासूनच ट्रेन प्रवास महागला आहे. रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, तिकीटाच्या किमतीत वाढ लागू होणार आहे. यामध्ये 215 किमीपेक्षा जास्त अंतराच्या सामान्य श्रेणीच्या तिकिटांसाठी प्रति किलोमीटर एक पैसा वाढवण्यात आली असून, मेल/एक्सप्रेस गाड्यांमधील नॉन-एसी आणि एसी वर्गांसाठी प्रति किलोमीटर दोन पैसे वाढ करण्यात आले आहेत.

मंत्रालयाने 21 डिसेंबर रोजी या वाढीची घोषणा केली होती आणि ती आज, 26 डिसेंबरपासून लागू होणार असल्याचे सांगितले. हे एक वर्षात दुसऱ्यांदा रेल्वे भाड्यात सुधारणा केली जात आहे. मागील भाडेवाढ जुलैमध्ये करण्यात आली होती. मंत्रालयाने या निर्णयाचे कारण प्रवाशांसाठी टिकिटांची सस्टेनेबिलिटी आणि कामकाजाची शाश्वतता यामध्ये संतुलन राखणे असल्याचे सांगितले आहे.

सुधारित भाडेवाढ उपनगरीय सेवा आणि हंगामी तिकिटांवर लागू होणार नाही. सब-अर्बन आणि गैर-उपनगरीय दोन्ही मार्गांवरील साधारण नॉन-एसी सेवांसाठी तिकीट दरांमध्ये वर्गवार तर्कसंगत बदल करण्यात आले आहेत. द्वितीय श्रेणी जनरलसाठी 215 किमी पर्यंतच्या प्रवासासाठी कोणतीही वाढ नाही, त्यामुळे कमी अंतराच्या दैनंदिन प्रवाशांवर परिणाम होणार नाही.

भाडेवाढीच्या तपशीलानुसार:

  • 216 ते 750 किमी प्रवासासाठी तिकीट 5 रुपये वाढेल.

  • 751 ते 1250 किमी प्रवासासाठी 10 रुपये वाढ.

  • 1251 ते 1750 किमी प्रवासासाठी 15 रुपये वाढ.

  • 1751 ते 2250 किमी प्रवासासाठी 20 रुपये वाढ होईल.

ही सुधारित भाडेवाढ राजधानी, शताब्दी, दुरंतो, वंदे भारत, तेजस, हमसफर, अमृत भारत, गरीब रथ, जन शताब्दी, अंत्योदय, गतिमान, युवा एक्सप्रेस आणि नमो भारत रॅपिड रेल यांसह इतर विशेष गाड्यांवरही लागू होईल. आरक्षण शुल्क, सुपरफास्ट शुल्क आणि जीएसटी यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी नवीन भाडेवाढ लक्षात घेऊन तिकीट बुक करणे गरजेचे आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com