राज्यात 18 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
Admin

राज्यात 18 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यात 18 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

राज्यात 18 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही अधिकाऱ्यांच्या वर्षभरापूर्वी बदल्या करण्यात आलेल्या होत्या. पण आता पुन्हा एकदा त्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. बालसिंग राजपूत यांची सायबर सेल विभागातून गुन्हे शाखा विभागात बदली करण्यात आली आहे.

नागपूरच्या राज्य राखीव बलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक मोराळे यांची पुण्याच्या राज्य राखीव बल येथे बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे मोहीतकुमार गर्ग यांची परिमंडळ दोन, गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांची परिमंडळ चार, प्रकटीकरण एकचे उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांची परिमंडळ नऊ अशी बदली करण्यात आली आहे.

तसेच योगेशकुमार गुप्ता यांची मुंबईतून नांदेडच्या नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधिक्षक, मोनिका राऊत यांची अकोला येथून नाशिक शहर, महेंद्र पंडित यांची मुंबईतून कोल्हापूर, शैलेश बलकवडे कोल्हापूर येथून पुणे येथे बदली करण्यात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com