Independence Day : लाल किल्लावर फडकतो नांदेडचा तिरंगा

Independence Day : लाल किल्लावर फडकतो नांदेडचा तिरंगा

भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कमलाकर बिराजदार, नांदेड 

भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवणार आहेत. यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात सुमारे 1,800 व्यक्तींना 'विशेष पाहुणे' म्हणून समारंभास उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. जय्यत तयारी या कार्यक्रमासाठी करण्यात आलेली आहे.

यावेळी लाल किल्लावर जो तिरंगा फडकवला जातो. तो नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योगमध्ये तयार झालेला आहे. मराठवाडा खादी ग्रामोद्योग हे महाराष्ट्रातील राष्ट्रध्वज निर्मितीचे एकमेव केंद्र आहे. या मंडळात तब्बल 1 कोटी राष्ट्रध्वज विक्रीसाठी तयार ठेवले जातात.

नांदेडमध्ये राष्ट्रध्वजाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जाते. नांदेडमध्ये बनवलेले ध्वज देशभर फडकवले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर जो राष्ट्रध्वज फडकवला जातो तो नांदेडमध्येच बनवण्यात आला आहे. लाल किल्ल्याशिवाय इतर अनेक राज्यांमध्येही ते फडकवले जातात. यावर्षी नऊ हजार 19 राष्ट्रध्वज बनवण्यात आले. यामध्ये 6 हजार 559 राष्ट्रध्वजांची विक्री झालीय, देशभरात चार ठिकाणी राष्ट्रध्वज बनवले जातात, सर्व कार्यालयांना नांदेडमध्ये बनवलेले राष्ट्रध्वज दिले जातात, अशी माहिती मराठवाडा खादी ग्रामोद्योगचे संचालक महाबळेश्वर मठपती यांनी दिलीय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com