ताज्या बातम्या
Trupti Desai : 'अण्णा मोरेंच्या आश्रमात वाल्मिक कराड, विष्णू चाटेला 2 दिवस लपवून ठेवलं होतं'
बीड प्रकरणावरुन तृप्ती देसाई यांनी मोठा दावा केला आहे.
बीड प्रकरणावरुन तृप्ती देसाई यांनी मोठा दावा केला आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या की, दिंडोरीतील स्वामी समर्थ सेवा केंद्र 2 आहे. हा आश्रम जो अण्णा मोरेंचा आहे. तिथे 20च्यावर भक्त निवासाच्या खोल्या आहेत. त्या खोल्यांमध्ये अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांनी मिळून वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांनाही लपवलं होते. ते दोघं तिथे वास्तव्याला होते.
त्यामुळे माझी पोलीस प्रशासन, सीआयडी आणि एसआयटी या सगळ्यांना विनंती आहे की, स्वामी समर्थ सेवा केंद्र 2 मधले जे काही सीसीटीव्ही आहेक ते ताबडतोब आपण ताब्यात घ्या तरच तो वास्तव्याला होता की नाही हे आपल्याला समजेल. असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.