शिवसेना-ठाकरे गटाच्या महिला नेत्यांमध्ये ट्विटवॉर

शिवसेना-ठाकरे गटाच्या महिला नेत्यांमध्ये ट्विटवॉर

उद्या किशोरी पेडणेकर यांना Ed चौकशी साठी बोलावण्यात आले आहे. त्यावर शीतल म्हात्रे यांनी किशोरी पेडणेकर यांना डिवचत
Published by  :
shweta walge

उद्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना Ed चौकशी साठी बोलावण्यात आले आहे. त्यावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी किशोरी पेडणेकर यांना डिवचत "कचोरी ताई दिवाळीच्या चकल्या यंदा जेलमध्येच खाणार वाटतं. दिवा पण फडफडून विझणार वाटतं" असं ट्विट केलं होत यावर किशोरी पेडणेकर यांनी पलटवार करत शीतल म्हात्रे यांचावर आरोपाच्या फैरी झाडल्या आहेत.

किशोरी पेडणेकर यांनी शीतल म्हात्रे यांना ट्वीटच्या माध्यमातून उत्तर देताना म्हंटले आहे की, शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर पक्ष निष्ठेची चकली बनवेन पण त्याच्यासाठी लागणारा दांडा कुठे आहे .मेलेल्या सासऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाऊन खोटी सही घेऊन बसली आहेस त्याचं काय?

त्यामुळे किशोरी पेडणेकर या उद्या ED चौकशी साठी खंबीर पणे सामोरे जाण्याच्या तयारीत असल्याचे ट्विटच्या माध्यमातून दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com