डोंबिवली रस्त्याच्या कामावरुन मनसे आणि शिंदे गटात ट्वीट युद्ध सुरु,वाद विकोपाला जाण्याची शक्यता

डोंबिवली रस्त्याच्या कामावरुन मनसे आणि शिंदे गटात ट्वीट युद्ध सुरु,वाद विकोपाला जाण्याची शक्यता

शिंदे गटाच्या मेळाव्या आधीच रस्त्याच्या कामावरुन मनसेकडून करण्यात आलेली बॅनरबाजीनंतर डोंबिवलीत राजकीय नेत्यांमध्ये ट्वीट युद्ध सुरु झाले आहे. शिंदे गटातील दीपेश म्हात्रे यांनी कामाच्या मुहूर्तासाठी ज्योतिषी कशाला शोधता. तुमच्या बाजूला ज्योतिषी राहतो. नाव न घेता मंत्री रविंद्र चव्हाण यांना टोला लागवला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अमजद खान, डोंबिवली

शिंदे गटाच्या मेळाव्या आधीच रस्त्याच्या कामावरुन मनसेकडून करण्यात आलेली बॅनरबाजीनंतर डोंबिवलीत राजकीय नेत्यांमध्ये ट्वीट युद्ध सुरु झाले आहे. शिंदे गटातील दीपेश म्हात्रे यांनी कामाच्या मुहूर्तासाठी ज्योतिषी कशाला शोधता. तुमच्या बाजूला ज्योतिषी राहतो. नाव न घेता मंत्री रविंद्र चव्हाण यांना टोला लागवला आहे. तर मनसे आमदार राजू पाटील यांनी कामाचे प्रश्न जबाबदार व्यक्तिांना विचारायचे नाही का असा प्रश्न उपस्थित करीत ठेकेदारांच्या पैशातून फक्त गाडय़ा घेण्याचे काम सुरु आहे असे ट् वीट केले आहे. त्यानंतर मनसे आणि शिंदे गटात ट्विट वार सुरू झालं आहे. हे ट्वीट युद्ध विकोपाला जाण्याची दाट शक्यता आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांनी रखडलेल्या रस्त्याच्या कामाबाबत बॅनरबाजी करुन शिंदे गटाला अप्रत्यक्षरित्या चिमटा काढला आहे. डोंबिवलीतील एमआयडीसी निवासी परिसरात वर्क ऑर्डर होऊन दोन महिने उलटले तरी रस्त्याची कामे सुरु झालेली नाही. त्यावर लक्ष्य केले आहे. कोणी मुहूर्त देतं का मुहूर्त असे बॅनरवर लिहत रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डरची कॉपीच त्या बॅनरवर झळकविली आहे. त्यावर शिंदे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी मुहूर्त कशाला शोधता ज्योतिषी तुमच्या बाजूलाच राहतात असे ट्वीट केले. या ट्वीटद्वारे म्हात्रे यांनी अप्रत्यक्षरित्या नाव न घेता मनसे आमदार पाटील आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांना लक्ष केले आहे. कारण चव्हाण यांनी चार दिवसापूर्वी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात रस्त्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले होते. कारण पलावा येथे मनसे आमदार पाटील आणि मंत्री चव्हाण हे शेजारी शेजारीच राहतात.

दीपेश म्हात्रे यांच्या ट्वीटवर पुन्हा मनसे आमदार पाटील यांनी कामाचे प्रश्न जबाबदार व्यक्तिांना विचारायचे नाही का असा प्रश्न उपस्थित करीत ठेकेदारांच्या पैशातून फक्त गाडय़ा घेण्याचे काम सुरु आहे असे ट्वीट केले आहे. या ट्वीटला म्हात्रे यांनी पुन्हा प्रतिउत्तर देत पत्र पत्र खेळून काय फायदा नाही. प्रशासनाच्या कामाची माहिती द्या. लोढाचे कमिशन, जागेचा व्यवहार, पलावा जंक्शऩला होत असलेली ट्रफिक आम्हाला ही तोंड उघडायला लावू नका असे म्हटले आहे. हा ट्विटवार सुरूच आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com