Elon Musk Twitter
Elon Musk TwitterTeam Lokshahi

ट्विटर शेअरहोल्डर्सची एलॉन मस्कच्या $44 अब्ज खरेदी कराराला मंजुरी

ट्विटर शेअरहोल्डर्सची एलॉन मस्कच्या $44 अब्ज खरेदी कराराला मंजुरी दिली आहे. ट्विटरने सांगितले की, जरी एलॉन मस्क हा करार रद्द करण्याचा प्रयत्न करत असले तरी, शेअरहोल्डर्सनी ट्विटरला $44 अब्जमध्ये विकत घेण्याच्या बोलीला सहमती दर्शविली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

ट्विटर शेअरहोल्डर्सची एलॉन मस्कच्या $44 अब्ज खरेदी कराराला मंजुरी दिली आहे. ट्विटरने सांगितले की, जरी एलॉन मस्क हा करार रद्द करण्याचा प्रयत्न करत असले तरी, शेअरहोल्डर्सनी ट्विटरला $44 अब्जमध्ये विकत घेण्याच्या बोलीला सहमती दर्शविली आहे. ट्विटर विकत घेण्यासाठी $44 अब्ज ऑफर मागे घेत असल्याचं एलॉन मस्क यांनी जाहीर केले होते. याचे कारण म्हणजे फेक अकाऊंटच्या संख्येबाबत पुरेशी माहिती देण्यात कंपनी अपयशी ठरली होती. त्याच वेळी, ट्विटरने सांगितले की, ते हा करार कायम ठेवू इच्छित आहे आणि यासाठी एलोन मस्कवर खटला दाखल करणार आहे.

मस्कने यापूर्वी 14 एप्रिल रोजी प्रति शेअर $ 54.20 या दराने ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली होती. यावर, मस्कने ट्विट केले होते की, त्यांनी ट्विटर विकत घेण्याची योजना तात्पुरती पुढे ढकलली आहे, याचे कारण साइटवरील बनावट खात्यांची वाढती संख्या आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या संदर्भात शेअरहोल्डर्सची बैठक पार पडली. ट्विटरने करार पूर्ण करण्यासाठी मस्कवर खटला दाखल केला आहे. त्याची सुनावणी ऑक्टोबरमध्ये होणार आहे. एलॉन मस्क यांनी यापूर्वी सांगितले होते की, ट्विटर हे बनावट, स्पॅम आणि बॉट अकाऊंटने भरलेले आहे. याच कारणामुळे त्यांनी ट्विटरसोबतचा करार मोडण्याचा आग्रह धरला. 'ट्विटरवरील 90 टक्के कमेंट्स एकतर फेक आहेत किंवा बॉट अकाउंट्स आहेत.असे त्यांने सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com