Twitter (X): ट्विटरने राजकीय भाषण असलेले पोस्ट्स हटवले

Twitter (X): ट्विटरने राजकीय भाषण असलेले पोस्ट्स हटवले

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने राजकारणी, पक्ष आणि उमेदवारांचे राजकीय भाषण असलेल्या काही पोस्ट्स हटवल्या आहेत.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने राजकारणी, पक्ष आणि उमेदवारांचे राजकीय भाषण असलेल्या काही पोस्ट्स हटवल्या आहेत.

परंतु, निवडणूक आयोगाचा हा आदेश ट्विटरला मान्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. एक्सने आम आदमी पार्टी, YSRCP, तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांच्या पोस्ट हटवल्या आहेत. एक्सने सांगितले आहे की भारताच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, राजकारणी, राजकीय पक्ष आणि निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवार यांच्याकडून शेअर केलेले राजकीय भाषण असलेल्या पोस्टवर कारवाई करणे आवश्यक आहे.

आदेशांचे पालन करून, आम्ही उर्वरित निवडणूक कालावधीसाठी या पोस्ट्स रोखून ठेवल्या आहेत; परंतु, आम्ही या कृतींशी असहमत आहोत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या पोस्ट्स आणि सर्वसाधारणपणे राजकीय भाषणापर्यंत विस्तारले पाहिजे असे आम्ही आमचं म्हणणं कायम ठेवतो.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com