पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याप्रकरणी दोघांना अटक

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याप्रकरणी दोघांना अटक

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. काही तरुणांनी इन्स्टाग्रामवर पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची स्टेटस स्टोरी पोस्ट केली आहे, यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ शकतो, अशी तक्रार 14 ऑगस्ट रोजी कुलाबा मार्केटमधीलच एका व्यापारी असलेल्या प्रथमेश चव्हाण यांनी पोलिसांत नोंदवली होती.

कुलाबा पोलीस ठाण्याच्या एटीएस पथकाने दोन तरुणांना शोधलं आणि ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणलं. दोन्ही तरुणांवर सीआरपीसी (CrPC) कलम 151(3) अन्वये प्रतिबंधात्मक अटकेची कारवाई करण्यात आली आणि त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन दोन्ही तरुणांनाही सोडून देण्यात आलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com