Crime
Crime Team Lokshahi

चोरी आणि फसवणूक प्रकरणी दोन मोठया बिल्डरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याण-चोरी आणि फसवणूक प्रकरणात दोन मोठय़ा बिल्डरांना डोंबिवलीतून अटक करण्यात आली आहे.

अमजद खान |कल्याण : कल्याण-चोरी आणि फसवणूक प्रकरणात दोन मोठय़ा बिल्डरांना डोंबिवलीतून अटक करण्यात आली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी निलेश जोशी आणि तुषार जोशी यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कल्याण पूर्व भागातील लोकग्राम परिसरात भगवती बिल्डरकडून इमारतीचे बांधकाम सुर होते. काही वर्षापूर्वी या इमारतीच्या बाजूला असलेले काही घरं तोडण्यात आली होती. एका व्यक्तिचे पूर्ण घरचं बिल्डरांनी गायब केले होते. या घरात काही वस्तू आणि रोकड चोरीला गेली होती. गणेश गवळींनी जेव्हा बिल्डरकडे विचारणा केली तेव्हा बिल्डरने पैसे परत केल्याचे सांगितले होते, मात्र तसे काही झाले नव्हते. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात चोरी आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता.

अखेर दोन वर्षानंतर कोळसेवाडी पोलिसांनी बिल्डर निलेश जोशी आणि तुषार जोशी या दोघांना डोंबिवलीहून अटक केली आहे. पोलिस अधिकारी हरीदास बोचरे या दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. चोरी आणि फसवणूक या प्रकरणी दोन बिल्डरांना अटक केल्याने शहरात ही एकच खळबळ उडाली आहे.

Crime
वाद सोडविण्यास गेलेल्या तरुणाचा दुदैवी मृत्यू, पोलिसांनी केली एकाला अटक
Lokshahi
www.lokshahi.com