kalyan
kalyan Team Lokshahi

वाद सोडविण्यास गेलेल्या तरुणाचा दुदैवी मृत्यू, पोलिसांनी केली एकाला अटक

कारला धक्का लागण्याच्या वादातून मारहाण
Published by :
Sagar Pradhan

अमजद खान|कल्याण: कारला धक्का लागण्याच्या रागातून टेम्पो चालक आणि त्याच्या साथीदारावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत घडली होती. जखमी झालेल्या दोघांपैकी एक विशाल मिश्र यांचा उपचारा दरम्यान दुदैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पंडित म्हात्रे याला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.

kalyan
'राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत नाही दम, म्हणूनच आम्हाला नाही गम'

डोंबिवली पूर्व भागातील सोनारापाडा परिसरात दोन दिवसापूर्वी कार चालक पंडित म्हात्रे याने टेम्पो चालक हर्षद रसाळ याच्याशी आधी हुज्जत घातली. पंडित म्हात्रेचा आरोप होता की, टेम्पो चालक हर्षद रसाळ याने कारला धडक दिली.

या वादात पंडित म्हात्रे याने हर्षदला मारहाण केली. वाद सोडविण्यासाठी पुढे सरसावलेल्या विशाल मिश्र या तरुणाने म्हात्रे याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. म्हात्रे हा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने त्याच्या साथीदारांना बोलावून घेतले. त्याने या दोन्ही तरुणांवर प्राणघातक हल्ला केली. उपचारा दरम्यान दोघे जखमी पैकी एक विशाल मिश्र याचा दुदैवी मृत्यू झाला. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पंडित म्हात्रे याला अटक केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com