Devendra Fadnavis' uncle Vivek Kaloti : अमरावतीत भाजपला दोन मोठे झटका! देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ आणि श्रीकांत भारतीय यांचा भाऊ पराभूत
AMC Election 2026 Result : अमरावती महापालिका निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला आहे. 87 जागांपैकी काही निकाल हाती आले असून, भाजपला दोन मोठे धक्के बसले आहेत. वॉर्ड क्रमांक 14 मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचे भाऊ तुषार भारतीय पराभूत झाले आहेत.
प्रभाग क्रमांक 14 मध्ये काँग्रेसने आपली ताकद दाखवली आणि चारही उमेदवार विजयी ठरले. मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी उत्साहात जल्लोष केला. तसेच साईनगर प्रभागात भाजपाचे तुषार भारतीय पराभूत झाले, तर युवा स्वाभिमानच्या उमेदवार सचिन भेंडे यांनी विजय मिळवला. आमदार रवी राणांनी या प्रभागातील निवडणूकासाठी विशेष प्रयत्न केले होते, तरीही निकाल काँग्रेस आणि युवा स्वाभिमानकडे झुकला.
थोडक्यात
• अमरावती महापालिका निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आले आहेत.
• 87 जागांपैकी काही निकाल हाती आले आहेत.
• भाजपला दोन मोठे धक्के बसले आहेत.
• वॉर्ड क्रमांक 14 मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती पराभूत झाले.
• तसेच आमदार श्रीकांत भारतीय यांचे भाऊ तुषार भारतीयही पराभूत झाले आहेत.
• या निकालांमुळे अमरावतीत भाजपच्या राजकीय स्थितीवर मोठा परिणाम होऊ शकतो.
• प्रारंभिक निकालांनुसार स्थानिक राजकारणात मोठा बदल दिसून येत आहे.

