ताज्या बातम्या
नाशिकमध्ये हत्यासत्र सुरूच; दोन सख्ख्या भावांची अंगणातच निर्घृण हत्या, मृतांपैकी एक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष
नाशिकमध्ये हत्यासत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.
नाशिकमध्ये हत्यासत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकमधील आंबेडकरवाडीत 2 सख्ख्या भावांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुन्ना जाधव, प्रशांत जाधव यांची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
उमेश उर्फ मुन्ना जाधव हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष असल्याची माहिती मिळत आहे. हत्या करून हल्लेखोर फरार झाले असून या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले असून नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या हत्येचा अधिक तपास सुरू आहे.