समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; रोहित पवार ट्विट करत म्हणाले...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; रोहित पवार ट्विट करत म्हणाले...

समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जालन्यातील कडवंची गावाजवळ ही घटना घडली. नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या इर्टिका कारला डिझेल भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा अपघात झाला.

याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात होऊन यात सात जणांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि अत्यंत दुःखद आहे. मृत्यू झालेल्या या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जे प्रवाशी जखमी आहेत ते लवकर बरे व्हावेत, ही सदिच्छा!

तसेच ते पुढे म्हणाले की, या मार्गावर वारंवार अपघात होऊन त्यात निरपराध लोकांचा बळी जात असल्याने सरकारने सुरक्षेबाबत कठोर उपाययोजना करण्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com