Aurangabad Gangapur Car Accident
Aurangabad Gangapur Car Accident Team Lokshahi

VIDEO : गंगापूर मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक; भीषण अपघात 4 जणांचा मृत्यू

औरंगाबादेतून अपघाताची एक भयंकर घटना समोर आली आहे. गंगापूर रोडवरील कायगावजवळ दोन कारचा भीषण अपघात झाला आहे.
Published by  :
Pankaj Prabhakar Rane

सचिन बडे : औरंगाबाद | औरंगाबादेतून अपघाताची एक भयंकर घटना समोर आली आहे. गंगापूर रोडवरील कायगावजवळ दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाल्याची प्राथामिक माहिती आहे.

Aurangabad Gangapur Car Accident
Megablock : मध्य रेल्वेचा 27 तासांचा मेगाब्लॉक; कोणत्या गाड्या रद्द? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!

अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास गंगापूर रोडवरील कायगावजवळ हा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात येणारी स्वीफ्ट कार आणि वॅग्नर कारमध्ये हा अपघात झाला आहे.

अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा अपघातात अक्षरश: चुराडा झाला. स्विफ्ट कारमध्ये औरंगाबाद येथील बजाजनगरमधील प्रवासी, तर वॅग्नरमध्ये अमरावती येथील प्रवासी होते, अशी प्राथामिक माहिती स्थानिकांनी दिली आहे.ऐन वर्दळीच्या रस्त्यात हा अपघात झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या भीषण अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील मृतांना तसेच जखमींना गंगापूर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com