Helicopter Crash
Helicopter CrashTeam Lokshahi

ऑस्ट्रेलियात दोन हेलिकॉप्टर हवेत धडकले; 4 जणांचा मृत्यू

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. हवेत दोन हेलिकॉप्टरची जोरदार टक्कर झाली

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. हवेत दोन हेलिकॉप्टरची जोरदार टक्कर झाली असून या अपघातात ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Helicopter Crash
'विकासाचे दुसरे नाव म्हणजे भाजप आणि विकासपुरुषाची ओळख म्हणजे मोदी'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्ड कोस्टवरील प्रसिद्ध पर्यटन स्थळ सी वर्ल्ड रिसॉर्टजवळ हा अपघात झाला. एक हेलिकॉप्टर उतरण्याच्या तयारीत असताना दुसरे टेक ऑफ करत होते. याचवेळी दोन्ही हेलिकॉप्टरची एकमेकांना धडकले. अपघातानंतर एका हेलिकॉप्टरचे सुरक्षित लँडिंग करण्यात यश आले. तर दुसरे हेलिकॉप्टर अपघातानंतर लगेचच कोसळले. अपघातात मृत्युमुखी पडलेले आणि जखमी झालेले बहुतांश प्रवासी अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये होते. त्यानंतर अनेक प्रवाशांना घटनास्थळीच प्राथमिक उपचार करण्यात आले.

अपघात होताच समुद्रकिनारी उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने अपघातग्रस्तांना मदत करण्यास सुरुवात केली. तेथे उपस्थित असलेल्या जेट स्की आणि बोटीच्या मदतीने जखमींना किनाऱ्यावर आणून उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

हा अपघात ऑस्ट्रेलियाच्या सी रिसॉर्टजवळ झाला हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हेलिकॉप्टर केवळ थीम पार्कचे होते. त्यावर थीम पार्कचा लोगो होता. खाली पडलेल्या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह ७ जण होते. त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय उद्यानात उपस्थित असलेली एक महिला आणि तिची दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये 6 जण होते. सर्व जखमी आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com