'भारत जोडो' यात्रेतील दोघांना ट्रकची धडक; अशोक चव्हाणांची त्वरितच रुग्णालयात धाव
विष्णुपरी (नांदेड): 'भारत जोडो' यात्रेसंबंधी धक्कादायक बातमी समोर आलीय. यात्रेदरम्यान दोन यात्रेकरूंना ट्रकने दिली धडक. माजी मुख्यमंत्री 'अशोक चव्हाणांची' त्वरितच रुग्णालयात धाव.
खासदार 'राहुल गांधी' यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या नांदेड जिल्ह्यातील 'भारत जोडो' यात्रेचा काल दिनांक १० नोव्हेंबर रोजी चौथा दिवस होता.नवीन मोंढा परिसरात आयोजित केलेल्या जाहीर सभेनंतर भारत यात्री महादेव पिंपळगाव येथील कॅम्पकडे रवाना झाले. दरम्यान, साडे आठ ते नऊ च्या सुमारास महादेव पिंपळगाव परिसरात नांदेड हाय-वे वर भारत जोडो यात्रेतील दोन यात्रेकरूंना ट्रकने धडक दिली. गणेशन (६२), सययुल(३०) धडक दिलेल्या यात्रेकरुंची नावे आहेत. हे तामिळनाडू राज्यातील स्थायिक नागरीक होते.
अपघातानंतर त्यांची रवानगी थेट शासकीय रुग्णालयात करण्यात आली, उपचारादरम्यान गणेशन (६२) या यात्रेकरूचा मृत्यू झाला, व दुसऱ्या यात्रेकरुवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुर्घटनेची बातमी कळताच माजी मख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार मोहन हंबर्डे यांनी त्वरितच शासकीय रुग्णालयात धाव घेतली. अशोक चव्हाण यांनी जखमी यात्रेकरूंच विचारपुस केली. परंतु डोक्यला जब्बर मार लागल्या कारणाने एका यात्रेकरूचा दुर्दैवी मृत्यू झाला.