Uddhav Thackeray : "मुंबईचे लचके तोडण्याचे काम दिल्लीतील दोन नेते...." उद्धव ठाकरेंचा मोदी आणि शाह यांच्यावर हल्लाबोल

Uddhav Thackeray : "मुंबईचे लचके तोडण्याचे काम दिल्लीतील दोन नेते...." उद्धव ठाकरेंचा मोदी आणि शाह यांच्यावर हल्लाबोल

आज वरळीतील येथील हॉटेल ब्ल्यू सी येथे दुपारी 12 वाजता ठाकरेबंधूनी पत्रकार परिषदेत घेत युतीची घोषणा केली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

(Thackeray Bandhu Yuti Exclusive :) राज्यात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरवात झाली त्यानंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. प्रमुख पक्ष युती आणि आघाड्यांचे गणित जुळवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. ठाणे, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड यासह एकूण 29 महानगरपालिकांची निवडणूक सोबत होत आहे. या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी केली जाईल. यानंतर प्रत्येकाला प्रश्न होता की ठाकरेबंधूची युती कधी होणार, आज वरळीतील येथील हॉटेल ब्ल्यू सी येथे दुपारी 12 वाजता ठाकरेबंधूनी पत्रकार परिषदेत घेत युतीची घोषणा केली आहे.

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माध्यामांशी बोलताना म्हणाले की, "संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करुन दिली. आज आम्ही दोघेही तिथे बसलो आहोत. न्यायाला हक्क देण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. आता मुंबईचे लचके तोडण्याचे काम दिल्लीतील दोन नेते बसले आहेत. आता जर भांडत राहिलो तर संघर्षाचा अपमान होईल. आम्ही एकत्र आलोत एकत्र राहण्यासाठी असे मी मागे म्हणालो होतो. यापुढे मुंबईवरती कोणीही वाकड्या नजरेने पाहणार नाही. जो कोणी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे कऱण्याचा विचार करेल, त्याचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. अशी शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत." असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

5 जुर्लैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकामंचावर उपस्थितीत होते. तो दिवस प्रत्येक शिवसेना ठाकरे गट आणि मनसैनिकांसाठी ऐतिहासिक दिवस ठरला आहे. त्यानंतर मात्र ठाकरेबंधूची वांरवार भेटीगाठी सुरु होत्या. प्रत्येक सणासुदीला दोघेबंधू भेटत होते. तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढणार आहेत. काल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी ट्विट टाकत पत्रकार परिषदेची माहिती दिली होती. राऊत यांनी या युतीच्या घोषणेची अधिकृत तारीखदेखील सांगितली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com