एअर होस्टेससोबत गैरवर्तन करणाऱ्या दोघांवर कारवाई
Admin

एअर होस्टेससोबत गैरवर्तन करणाऱ्या दोघांवर कारवाई

एअर होस्टेससोबत गैरवर्तन करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

एअर होस्टेससोबत गैरवर्तन करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. नुकताच स्पाइसजेटच्या विमानात एअर होस्टेससोबत गैरवर्तन करत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. दिल्लीत बोर्डिंगच्या दरम्यान एका प्रवाशाने बेजबाबदार आणि अयोग्य वर्तन केले अशी माहिती एका सुरक्षा कर्मचाऱ्याने दिली. या प्रवाशांनी केबिन क्रूला त्रास दिला. ही घटना घडल्यानंतर केबिन क्रूने तत्काळ या घटनेची माहिती पीआयसी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिली.

स्पाईसजेटचे वेट-लीज्ड कॉरोंडेन फ्लाइट २३ जानेवारी २०२३ रोजी दिल्लीहून हैदराबादकडे जाणार होते. त्यावेळी याच विमानातील केबिन क्रूशी प्रवाशांनी गैरवर्तन केल्याची घटना घडली. त्यानंतर स्पाइसजेटने तत्काळ कारवाई करत या प्रवाशांना विमानातून उतरले. तसेच, त्या दोघांना सुरक्षा पथकाकडे सोपवण्यात आले. अशी माहिती स्पाइसजेटने दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com