‘एसटी’च्या तुटलेल्या पत्र्यामुळे दोन तरुणांचे हात कापले; दोघांची प्रकृती चिंताजनक

‘एसटी’च्या तुटलेल्या पत्र्यामुळे दोन तरुणांचे हात कापले; दोघांची प्रकृती चिंताजनक

महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसच्या पत्र्यामुळे दोन तरुणांचे हात कापले गेले आहेत. मलकापूर-पिंपळगाव मार्गावरील एसटी बसच्या तुटलेल्या पत्रामुळे त्यांचे हात कापले गेले आहेत. बस चालकच्या आसनाच्या मागील रांगेमधील पत्रा तुटल्याने तो बाहेर आला होता.

ही बस मलकापूरवरुन पिंपळगावला जाणाऱ्या मार्गावर असतानाच पोलीस प्रवेश परीक्षेसाठी सराव करणारे काही तरुण मॉर्निंगवाला जाताना हाताचे व्यायम करत रस्त्याच्या बाजूने संथ गतीने धावत होते. त्याचवेळी ही बस बाजूने गेली आणि दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. त्यानंतर बस चालकाने ही बस मलकापूर पोलीस स्थानकामध्ये नेली आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस घटनास्थळी पोहचले असून प्रकरणाचा पंचनामा सुरु आहे

Lokshahi
www.lokshahi.com