ताज्या बातम्या
कुर्ल्याचे दोन तरुण माहिम कॉजवे येथील मिठी नदीत बुडाले
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर कुर्ला येथील दोन तरुण माहिम कॉजवे येथील मिठी नदीत बुडाले असल्याची माहिती मिळाली आहे. माहिम दर्ग्यात दर्शनासाठी हे तरुण गेले होते.
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर कुर्ला येथील दोन तरुण माहिम कॉजवे येथील मिठी नदीत बुडाले असल्याची माहिती मिळाली आहे. माहिम दर्ग्यात दर्शनासाठी हे तरुण गेले होते. काल मध्यरात्री घरी जात असताना, लघुशंकेसाठी दोन मित्र माहीम खाडीवर उभे होते. एकाचा पाय सरकल्याने एक मुलगा खाली पडला, त्याला वाचवण्यासाठी दुसरा गेला असता दोघेही पाण्यात बुडाले. एकाची बॉडी किनाऱ्यावर सापडली आहे, तर दुसऱ्याचा शोध पोलिस घेत आहेत.
मुंबईत पावसाचा जोर वाढल्यामुळे तरुणाचा मृतदेह शोधण्यास अधिक त्रास होत आहे.