UAE President Sheikh Khalifa Dies
UAE President Sheikh Khalifa DiesTeam Lokshahi

संयुक्त अरब अमिरातच्या राष्ट्राध्यक्षांचं निधन; 40 दिवसांची राष्ट्रीय सुट्टी

UAE President Sheikh Khalifa Dies : जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
Published by :
Sudhir Kakde

संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे निधन झाले आहे. ते 73 वर्षांचे होते. राज्य वृत्तसंस्था डब्ल्यूएएमने शुक्रवारी या संदर्भात माहिती दिली आहे. राष्ट्रपती कार्यालयानेही त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. शेख खलिफा यांच्या निधनावर जगभरातून लोकांनी शोक व्यक्त केला आहे. (UAE President Sheikh Khalifa Dies)

UAE President Sheikh Khalifa Dies
Twitter deal : ट्विटर विकत घेण्याचा इलॉन मस्कचा करार स्थगित, जाणून घ्या कारण...

शेख खलिफा 2019 मध्ये चौथ्यांदा पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी निवडून आले. UAE च्या सर्वोच्च परिषदेने त्यांची पुन्हा अध्यक्ष म्हणून निवड केली. शेख खलिफा यांनी 3 नोव्हेंबर 2004 पासून संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक म्हणून पदभार स्वीकारला. शेख खलिफा यांना त्यांच्या वडिलांचा उत्तराधिकारी म्हणून निवडण्यात आलं होतं.

UAE President Sheikh Khalifa Dies
जीनाच्या कबरीवर अडवाणी गेले, भाजपने कोणती कारवाई केली? काँग्रेसचा भाजपला सवाल

दरम्यान, त्यांच्या मृत्यूनंतर देशात 40 दिवसांची राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शेख खलिफा हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, शेख खलिफा यांच्या निधनानंतर यूएईमध्ये राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. UAE मध्ये 40 दिवसांची राष्ट्रीय सुट्टी असेल. या दरम्यान ध्वज अर्ध्यावर चढवण्यात येईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com