Uday Samant
Uday Samant Team Lokshahi

मोदींना पत्र देणारेच आंदोलन पेटवत आहेत - उदय सामंत

कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलन सुरु आहे.

कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलन सुरु आहे. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, प्रकल्प हद्दपार होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली होती की, रिफायनरी हा प्रकल्प आल्यानंतर पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. महाराष्ट्राचा जीडीपी वाढणार आहे. म्हणून हा प्रकल्प बारसुमध्ये करावा, अस पत्र उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान यांना दिले आहे, असा खुलासा उदय सामंत यांनी केला आहे.

यावर संजय राऊत म्हणाले की, बारसूची जागा ठाकरेंनी सुचवली. होय, ठाकरेंनीच पत्र लिहिले होते. उद्योग जगला तर कामगार जगेल. बारसू रिफायनरीला जनतेचा विरोध असेल तर आमचाही विरोध. उद्योग आले पाहिजे हिच आमची भूमिका. फॉस्ककॉन प्रकल्प का गेला ते आधी सांगा. विरोध हा नाणारला होता. आम्ही उद्योगाचे शत्रू नाही. उदय सामंत यांनी शहाणपणा करू नये. फॉक्सकॉन वेदांता, एअरबस परत घेऊन या, लोक विरोध करणार नाही. असे संजय राऊत म्हणाले.

यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामंत म्हणाले की, बारसूच्या लोकांना सांगितले पाहिजे ना त्यांनी पत्र काय लिहिलेय ते. उद्धव ठाकरेंनी ते पत्र का दिलं हे विनायक राऊतांन तेथील आंदोलनकर्त्यांना सांगितले पाहिजे. तिथले आमदार आजही रिफायनरीचे समर्थन करतात. मी आज राज ठाकरेंची भेट मागितली आहे. आंदोलन नक्की होतेय पण पेटवणारे कोण आहेत. जे पत्र देतात तेच पेटवणारे आहेत. असे उदय सामंत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com