Uday Samant
Uday SamantTeam Lokshahi

उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करणारे हात शिवसैनिकांचेच? व्हिडिओ आला समोर

या व्हिडिओमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

उदय सामंत हल्ला प्रकरणात आणखीन एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या व्हीडिओमध्ये दिसत असलेल्या दृश्यानुसार उदय सामंत यांच्या गाडीची काच दगडाने नाहीतर हाताने फोडली असल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ लोकशाहीच्या हाती लागला असून, दोन जणांनी सामंत यांच्यां गाडीवर दोन वेळा हाताने मारलं असल्याचं दिसतंय. यामुळे गाडीच्या काचेला तडे गेले आणि काच फुटली.

विशेष म्हणजे गाडीवर हात मारणाऱ्यांच्या हातात शिवबंधन दिसत आहेत. तीन वेळा गाडीच्या काचावर हात मारल्यानंतर काच फुटल्याचं दृश्य दिसतंय. त्यामुळे हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याची शक्यता आता बळावली आहे.

Uday Samant
देवेंद्र फडणवीस दिल्लीवरुन गोड बातमी घेऊन येणार; उद्या शपथविधी होणार
Lokshahi
www.lokshahi.com