'आम्ही जालनाला जाताना काही लोक डेहराडूनला गेले' उदय सामंताचा कोणाकडे इशारा?

'आम्ही जालनाला जाताना काही लोक डेहराडूनला गेले' उदय सामंताचा कोणाकडे इशारा?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिला आहे. यावरच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगेंनी घेतलेल्या निर्णयाचे धन्यवाद केले आहे.
Published by :
shweta walge

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिला आहे. यावरच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगेंनी घेतलेल्या निर्णयाचे आभार मानले. तसंच उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली आहे.

उदय सामंत काय म्हणाले?

जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु होते. न्यायमूर्ती गायकवाड आणि न्यायमूर्ती सप्रे यांनी त्यांची काल भेट घेतली आणि सगळ्या गोष्टी जरांगेंना सांगितल्या. आणि सरकार म्हणून आम्ही मंत्र्यांनी जरांगेंची भेट घेतली. सरकारच्या अडचणी त्यांना समजून सांगितल्या. मला मनोज जरांगेंना मनापासून धन्यवाद द्यायचे आहे की, दिवाळी सणाआधी त्यांनी हा निर्णय घेतला. ते फक्त आंदोलन करत नाही तर ते संवेदनशील देखील आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन स्थगित केलं.

शिंदे समितीने दोन महिन्यात काम करावं. पहिल्या आंदोलनातील केसेस आहे ते १५ दिवसांत मागे घेऊ. केसेस टप्याटप्याने मागे घेऊ. सर्वात महत्वाचं म्हणजे की आम्ही एकमताने टिकणार आंदोलन घेऊ. ह्या आंदोलन मागे काही लोकांचे मनसुबे होते. मनोज जरांगे सांगत होते की जाळपोळ कोणी करू नये असे सांगत आहे. तरीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालं. जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा हेतू होता. शेतकऱ्यांचे नुकसान शिंदे सरकार भरपाई देत आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका

काल आम्ही जालनाला जात होतो तेव्हा काही लोक डेहराडूनला गेले. अश्या लोकांना आंदोलनावर बोलण्याचा अधिकार आहे का?

स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी कोणीही हया आंदोलनाचा फायदा घेऊ नये. तसेच राजकीय वापर करु नये.

अनेक मराठा समाजाचे लोक मुख्यमंत्री झाले होते पण मराठा समाजासाठी टिकणार आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी केलं. कोणाचे आरक्षण हिरावून न घेता मराठा समजला टिकणारे दिले जाईल. असं ते म्हणाले आहेत.

'आम्ही जालनाला जाताना काही लोक डेहराडूनला गेले' उदय सामंताचा कोणाकडे इशारा?
उद्धव ठाकरेंवर टीका करत नितेश राणेंचा मोठा दावा; म्हणाले, लवकरच आदित्य ठाकरे...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com