Uday Samant: शिवसेनेत राजकीय 'उदय'? मंत्री सामंतांचा थेट वार; संजय राऊत, वडेट्टीवारांना म्हणाले...

विजय वडेट्टीवारांनी शिंदे यांना संपवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला आहे. उदय सामंतांनी वडेट्टीवार आणि संजय राऊत यांच्यावर प्रत्युत्तर दिले आहे, अशा षडयंत्रांना मी भिक घालत नाही असे त्यांनी म्हटले आहे.
Published by :
Prachi Nate

राजकीयवर्तुळात सध्या विजय वडेट्टीवार यांनी नुकतीच एक ठिणगी टाकली आहे. त्यांनी नागपूरमध्ये माध्यमांसोबत बोलताना उद्धव ठाकरेंना संपवल्यानंतर आता शिंदेंना संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. शिंदेंच्या शिवसेनेत नवा 'उदय' होण्याची शक्यता वर्तावली जात आहे असं देखील वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे वडेट्टीवारांचा रोख नेमका कुणाकडे? याकडे देखील सर्वांच लक्ष लागलेलं आहे. याचपार्श्वभूमीवर वडेट्टीवारांनी केलेल्या या वक्तव्यावर उद्योगमंत्री उदय सामंतांनी वडेट्टीवार यांच्यासह संजय राऊत यांच्यावर देखील थेट वार केला आहे.

तुम्ही भाजपमध्ये येण्यासाठी मुख्यमंत्र्यांना किती वेळा भेटलात- मंत्री उदय सामंत

दरम्यान मंत्री उदय सामंत म्हणाले की, विजय जी मला असं वाटत की, एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबामधून मोठे झाले आहेत. मी देखील सर्वसामान्य कुटुंबातून मोठा झालेलो आहे. त्याचसोबत तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झालेले आहात. त्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातील लोक एकत्र येत असतील तर त्यांना बाजूला करण्याचा षडयंत्र करु नक. कारण, तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किती वेळा भेटलात याची पुर्ण माहिती माझ्याकडे आहे.

मी राजकीय नैतिकता पाळत असल्यामुळे...- उदय सामंत

परंतु मी काही राजकीय नैतिकता पाळतो आणि राजकीय नैतिकता पाळत असल्यामुळे मी कधीही वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही. परंतु जर एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करु नये, हीच माझी सुचना आहे. पुन्हा एकदा सांगतो जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे धादांत खोट आहे.

अशा प्रकारच्या षडयंत्रांना मी भिक घालत नाही- उदय सामंत

हे निषेध करण्यासारख आहे. त्यामुळे मी या गोष्टीचा निषेध करतो आणि मी एकनात शिंदेंसोबत होतो आणि पुढे देखील त्यांना जेव्हा माझी गरज लागेल मी त्यांच्यासोबत असेन. अशा प्रकारच्या षडयंत्रांना मी भिक घालत नाही, असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com