Uday Samant : राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर उदय सामंत म्हणाले...
उदय सामंत यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. ही भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, पुण्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर विश्व मराठी संमेलन झालं होते. त्या संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी राज साहेबांना उपस्थित राहण्याची विनंती केली होती. ती विनंती केल्यानंतर ते स्वत: कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी मार्गदर्शन केलं होते. त्याच्यानंतर त्यांची आणि माझी भेट होऊ शकली नव्हती. त्यांचे आभार मानण्यासाठी आज मी त्यांच्या घरी आलो होतो.
मराठी भाषेसंदर्भात चर्चा झाली. राजकीय कुठलीही चर्चा झाली नाही. या भेटीला राजकीय कुणी स्पर्श करु नये. राज ठाकरेंसोबत चर्चा केल्यानंतर अजून काही गोष्टी कळतात. राज साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे एकत्र येणार का हे माझ्या दृष्टीने फार मोठा विषय आहे.
एवढ्या पातळीवरच्या चर्चेमध्ये मी कधीच पडलेलो नाही. राज साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे जर एकत्र येणार असतील तर त्या दोघांमध्ये चर्चा झाली पाहिजे. राजकारणापलिकडची चर्चा होती. असे उदय सामंत म्हणाले.