"मराठीच्याबाबतीमध्ये जर कोण उलट- सुलट करत असेल तर..."; राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया

"मराठीच्याबाबतीमध्ये जर कोण उलट- सुलट करत असेल तर..."; राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया

मराठीच्या मुद्यावरून मनसे आक्रमक असतानाच आज उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मराठीच्या मुद्यावरून मनसे आक्रमक असतानाच आज उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर उदय सामंत म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये मराठीच्यासंदर्भामध्ये ज्या काही घडामोडी सुरु आहेत. त्यासंदर्भामध्ये मला आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून राज साहेबांनी बोलावले होते. इथे येताना मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगून त्यांची परवानगी घेऊन आलो होतो.

महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने संस्था आहेत काही बँका आहेत. त्या बँकांमध्ये मराठीच्या बाबतमध्ये जो काही निर्णय घेतला जातो. याचा प्रतिंबध कसा करायचा या संदर्भामध्ये राज साहेबांनी काही सूचना आम्हाला केलेल्या आहेत. अनेक भाषा महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात. ज्या पद्धतीने मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय केला जातोय. त्याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. त्याला कायदेशील वलय असलं पाहिजे असे राज साहेबांचं मत आहे.

राज साहेबांबरोबर मराठी भाषेसंदर्भात जी काही चर्चा झालेली आहे ती मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक समिती गठित केलेली आहे. या सगळ्या समित्यांची बैठक घेऊन मराठीच्याबाबतीमध्ये जर कोण उलटं सुलटं करत असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करायची ही भूमिका त्या बैठकीमध्ये आम्ही घेऊ. असे उदय सामंत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com