ताज्या बातम्या
Uday Samant : मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज ठाकरेंची भेट घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज ठाकरेंची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही पहिली भेट होती. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात 1 तास भेट झाली.
याच पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत म्हणाले की, जर EVMवर विश्वास नाही तर मुख्यमंत्र्यांना भेटू नका ना.
EVMवर विश्वास नाही सांगणारे मुख्यमंत्र्यांना भेटतात. एकीकडे असे दाखवतात मुख्यमंत्री झालेले ते योग्य आहे, म्हणजे सरकार आलेलं आहे ते योग्य आहे. हा दुटप्पीपणा आहे. असे उदय सामंत म्हणाले.