Uday Samant : 21 किंवा 22 फेब्रुवारीला राजकारणात भूकंप होणार, सामंताचा गौप्यस्फोट
लोकशाही मराठी न्यूज चॅनेल आयोजित 'ग्लोबल महाराष्ट्र' महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी काल भव्य संमेलन पार पडल. या कार्यक्रमाला दुपारी 2 वाजल्यापासून सुरुवात झाली असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला. याचपार्श्वभूमिवर मंत्री उदय सामंत यांनी देखील लोकशाही मराठीच्या ग्लोबल महाराष्ट्र कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती.
यादरम्यान 21 किंवा 22 फेब्रुवारीला राजकारणात भूकंप होणार, उदय सामंत यांनी असा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा होत असल्याच देखील त्यांनी लोकशाही मराठीच्या 'ग्लोबल महाराष्ट्र' कार्यक्रात सांगितलं आहे. शिवसेनेत आता कोणाची एन्ट्री होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेल आहे.