Udayanraje Bhosle : साताऱ्यात आज उदयनराजे भोसले भरणार उमेदवारी अर्ज

Udayanraje Bhosle : साताऱ्यात आज उदयनराजे भोसले भरणार उमेदवारी अर्ज

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले यांच्यात थेट लढत होणार आहे.

आज साताऱ्यात उदयनराजे भोसले उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती मिळत आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com