Uddhav Thackeray On Narendra Modi
Uddhav Thackeray On Narendra Modi

'अब की बार भाजप तडीपार'चा नारा गावागावात पोहोचवा, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

भाजप खंडण्या गोळा करणारी टोळी आहे, भाजप पुढील ५०० वर्षे सत्तेत येणार नाही, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
Published by :

भाजप खंडण्या गोळा करणारी टोळी आहे. भाजप पुढील ५०० वर्षे सत्तेत येणार नाही. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून देश लुटण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोदी म्हणतात अच्छे दिन आयेंगे, पण आता सच्चे दिन येतील. भाजप सर्वांचे पक्ष फोडत आहे. यांनी कमळऐवजी हातोडा हातात घ्यावा. देवेंद्र फडणवीसांना फोडाफोडीचा परवाना देऊन टाका. अबकी बार भाजप तडीपार, हा उद्धव ठाकरेंचा नारा आहे. हा नारा गावागावत पोहोचला पाहिजे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारव पुन्हा एकदा तोफ डागली. ते हिंगोलीत जनतेला संबोधीत करताना बोलत होते.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मी संपूर्ण राज्यभर फिरतोय. संपूर्ण महाराष्ट्र मला कुटुंबातील एक सदस्य मानतो. मी आयुष्यात कधी गद्दारी केली नाही. परस्त्री माता भगिनी समान या छत्रपती शिवरायांच्या आदर्शाप्रमाणे आम्ही वागतो. पण आता चोराच्या हाता धनुष्यबाण आहे. सत्ताधारी न्यायमुर्ती नाही. नायमुर्तीचं वेगळं स्थान आहे. सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीच्या बाजूनं निकाल दिला. शरद पवारांसारख्या व्यक्तीचं नाव आणि फोटोही चोरता. सर्वांचे पक्ष तुम्ही फोडत आहात. शिव्या देणाऱ्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसता.

पक्ष फोडल्याचा अभिमान कसला वाटतो यांना, तुम्ही आमच्या वडिलांचा फोटो लावण्यापेक्षा ईडी, सीबीआयचे फोटो लावा. मोदी म्हणतात, अच्छे दिन आयेंगे, आता सच्चे दिन येतील. फडणवीसांना फोडाफोडीचा परवाना देऊन टाका. निवडूक रोख्यांच्या माध्यमातून देश लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. हा मतदार संघ शिवसेना बालेकिल्ला आहे आणि तो आम्ही जिंकणारच, असा विश्वासही ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com