बातम्या
उद्धव ठाकरेंना अजून एक धक्का; कथित बंगला प्रकरणात गुन्हा दाखल
उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या कथित 19 बंगलो घोटाळाप्रकरणात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या कथित 19 बंगलो घोटाळाप्रकरणात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर क्रमांक 26 नुसार, आयपीसी कलम 420, 465, 466, 468 आणि 34 प्रमाणे मुरुडच्या ग्रामविकास अधिकारी संगिता भांगरे यांनी हा गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणात सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी वेळोवेळी शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने कर आकारणी प्रक्रियेचा जाणीवपुर्वक अंमल केला नाही. तसेच ग्रामपंचायतीच्या मिळकत नोंदवहीमध्ये बेकायदेशीर नोंदी घेऊन खोटे दस्ताऐवज तयार केल्या प्रकरणात हा गुन्हा आहे.
या प्रकरणात सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तत्कालीन ग्रामसेवकाचा देखील समावेश आहे